Multibagger Stocks: गुंतवणूकदार झाले मालामाल! ‘या’ शेअर्सने दिला 6 दिवसात 49% परतावा… तुमच्याकडे आहे का?

Published on -

Multibagger Stocks:- सध्या जर आपण शेअर बाजाराची स्थिती बघितली तर त्यामध्ये आपल्याला चढउतार दिसून येत असून कधी बाजारात वाढ तर कधी घसरण दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मात्र अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले असून गुंतवणूकदारांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. परंतु या संमिश्र अशा वातावरणामध्ये देखील अनेक कंपन्यांचे शेअर्स वधारल्याचे दिसले व गुंतवणूकदार मालामाल झाले. अगदी या घसरणीमध्ये आपण बघितले तर मोशचीफ टेक्नॉलॉजी या चिप कंपनीचा शेअर्स मात्र या घसरणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वधारल्याचे दिसून आले व चक्क सहा दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांचा रिटर्न दिला. शुक्रवारी या शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी 10% पेक्षा जास्तची वाढ पाहायला मिळाली. सध्या सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत असून त्याचाच परिणाम या शेअर्सच्या वाढीमागे दिसून आला. जर आपण या कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स बघितला तर बीएससी इंट्राडेमध्ये हा शेअर्स तब्बल 10.07 टक्क्यांनी वाढून 244.95 रुपयांवर पोहोचला व सध्या 5.73% च्या वाढीसह 235.5 रुपयांवर आहे.

मोशचीप टेक्नॉलॉजी शेअरचा परफॉर्मन्स

जर वर्षभरापासूनची स्थिती बघितली तर 16 सप्टेंबर 2024 रोजी मोशचिप टेकचे शेअर्स 279 रुपयांवर होते. हा या शेअरचा एक वर्षाचा विक्रमी उच्चांक असून या उच्चांका वरून सात महिन्यांमध्ये या शेअरमध्ये 55.09% ची घसरण झाली व सात एप्रिल 2025 ला 125.30 रुपयांवर आला व ही पातळी या शेअरची एक वर्षाची नीचांकी पातळी ठरली. परंतु सध्या परिस्थिती बघितली तर अगदी सहा दिवसात मोशचिप शेअर्समध्ये 48% पेक्षा जास्त वाढ झाली. तसेच शेअर होल्डिंग बघितली तर परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 1.01% आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 37.13% हिस्सा आहे व प्रमोटर्स कडे या कंपनीचे साधारणपणे 44.28% शेअर्स आहेत. ही कंपनी इंटिग्रेटेड सर्किट तयार करते व त्याची विक्री करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe