Apple ला एक आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो ? कंपनीला एका iPhone च्या विक्रीतून किती रुपये मिळतात ? वाचा….

Updated on -

Iphone Making Price : एप्पल ही एक जगप्रसिद्ध  टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन जगात सगळीकडे वापरले जातात. भारतातही iPhone वापरणाऱ्यांची कमी नाही. देशात आयफोन हा एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. आयफोन हा धनदांडग्यांचा फोन अस बोललं जात.

दरम्यान एप्पल ने आपली एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एप्पलकडून नवीन सिरीज लॉन्च केले जाते. यानुसार, अलीकडेच एप्पलने आपली नवीन iPhone 17 सिरीज लॉन्च केली आहे.

ॲपलच्या प्रत्येक सिरीजच्या हँडसेटला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आयफोन 16 देखील ग्राहकांमध्ये मोठा हिट ठरला होता. आता आयफोन 17 देखील तेवढाच हिट ठरेल अशी आशा कंपनीला आहे.

पण तुम्हाला एप्पल कंपनीला आयफोन बनवण्यासाठी नेमका किती खर्च करावा लागतो याची माहिती आहे का? नाही. मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कंपनीला आयफोन 16 बनवण्यासाठी नेमका किती खर्च करावा लागला होता. तसेच यातून कंपनीला किती नफा मिळाला याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण ही रेखातून समजून घेणार आहोत. 

मिळालेल्या माहितीनुसार एप्पल कंपनीला iPhone 16 प्रो चे 256 GB व्हेरियंट बनवण्यासाठी जवळपास 580 डॉलर खर्च करावा लागला. भारतीय रुपयांमध्ये हा हँडसेट बनवण्यासाठी कंपनीला 51 हजार रुपये खर्च करावे लागले आहेत.

कंपनीला या हँडसेटच्या A 18 Pro चीपसाठी 8000 रुपये, रियर कॅमेरा सिस्टमसाठी 11183 रुपये, डिस्प्लेसाठी 3344 रुपयांचा खर्च करावा लागला. दरम्यान अॅपलने हा फोन एक लाख 19 हजार 900 रुपयांच्या किमतीसह लॉन्च केला.

अर्थात कंपनीला 256 जीबी आयफोन 16 प्रो विक्रीतून 69 हजार रुपयांचा नफा मिळाला. पण या हँडसेटच्या एकूण नफ्यात मार्केटिंग, संशोधन, पॅकेजिंग आणि शिपिंग खर्चाचा सुद्धा समावेश होतो.

त्याचवेळी आयफोन 16 प्रो मॅक्स बनवण्यासाठी देखील कंपनीला 51 हजार रुपये इतकाच खर्च झाला. पण हा हँडसेट ग्राहकांना एक लाख 44 हजार 900 रुपयांना विकण्यात आला. अर्थात या हँडसेटच्या विक्रीतून कंपनीला 94 हजार रुपयांचा नफा मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News