Ladki Bahin yojana:- महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ पात्र महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो.
सध्या सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली असताना मात्र ऑगस्ट महिन्याचा लाभ अजून पर्यंत कशा माध्यमातून देण्यात आलेला नव्हता व त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये संभ्रमावस्था होती.

परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ देता यावा याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये यामुळे जमा होणार आहे.
ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरित
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लाडकी बहीण योजनेचे राज्यात एकूण 2 कोटी 48 लाख लाभार्थी महिला असून आतापर्यंत जुलै 2025 पर्यंतचा लाभ महिलांना देण्यात आलेला आहे व ऑगस्ट महिन्याचा लाभ मात्र अजून पर्यंत देण्यात आलेला नव्हता.
सप्टेंबर महिना करून जवळपास एक आठवडा झाला तरी सुद्धा पैसे खात्यावर जमा झालेलं नव्हते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यावर कधी जमा होतील याची प्रतीक्षा महिलांना लागून होती. परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता देता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने 344 कोटी रुपये निधी वितरित केला असून लवकरच ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण 3660 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसे पाहायला गेले तर सप्टेंबरमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळेल अशा प्रकारचे चर्चा पाहायला मिळाले होते. परंतु सध्या तरी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यासाठीचा निधी स्वतंत्रपणे जारी केलेला आहे.