GST Rate:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी स्लॅबमध्ये बराच मोठा बदल करण्यात आला असून त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच काही वाहनांच्या किमती कमी होण्यास मदत झालेली आहे.
त्यामुळे सणासुदीच्या कालावधीत देशातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी दरामधील या बदलाचा फायदा आता शेतकऱ्यांना देखील मिळणार असून यासंबंधीची महत्त्वाची माहिती देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघितले तर जीएसटी दरांमध्ये ज्या काही सुधारणा करण्यात आलेले आहेत त्याचा फायदा हा कृषी उपकरणे आणि ट्रॅक्टर खरेदीवर देखील मिळणार असून विविध यंत्रे व ट्रॅक्टर वरील जीएसटी आता 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.
ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजारांची बचत
जीएसटी दरांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे आता ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या किंमती कमी होणार आहेत व याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी हे अतिशय महत्त्वाचे आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
नवीन जीएसटी बदलामुळे आता ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत. 35 अश्वशक्तीचे ट्रॅक्टर घेतले तर 41 हजार रुपये शेतकऱ्यांचे वाचणार आहेत. तसेच 50 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर 53 हजार रुपये तर 45 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर 45 हजार रुपये शेतकऱ्यांना वाचवता येणार आहेत.
तसेच शेतकऱ्यांना जर जास्त पावरचे म्हणजेच 75 अश्वशक्ती पर्यंतचे ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर यामध्ये शेतकऱ्यांना 63 हजार रुपये वाचवता येणार आहेत. इतकेच नाही तर शेतीसाठी महत्त्वाचे असलेले पावर टिलर शेतकऱ्यांनी घेतले तर 13 अश्वशक्तीच्या पावर टिलर खरेदीवर 11875 रुपये वाचवता येणार आहेत. तर मल्टी क्रॉप थ्रेशरच्या खरेदीवर शेतकऱ्यांचे 14 हजार रुपये वाचणार आहेत.