मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

Published on -

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना आता लॅपटॉप दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली होती. खरे तर विभागातील कर्मचाऱ्यांना लॅपटॉपची नितांत आवश्यकता असते. यासाठी त्यांनी मे महिन्यात आंदोलन देखील उभारले होते.

त्यावेळी कृषी विभागातील जवळपास 13000 कर्मचाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार अशी घोषणा राज्य सरकारने केली. मात्र राज्य सरकारने घोषणा केल्यानंतरही कृषी विभागाने कर्मचाऱ्यांना लॅपटॉप ऐवजी टॅब देण्याचा निर्णय घेतला.

प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी लॅपटॉप ऐवजी टॅब कशा पद्धतीने उपयुक्त आहे हे पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न केला. टॅब कशाप्रकारे प्रशासकीय कामांमध्ये उपयुक्त ठरतो हे पटवून देण्याचा प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न झाला.

पण कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून टॅब नको लॅपटॉपच हवा अशी आग्रही मागणी लावून धरण्यात आली. प्रशासनाकडून टॅबची सक्ती केली जात होती यामुळे कृषी विभागातील कर्मचारी कमालीचे आक्रमक झाले.

कर्मचाऱ्यांकडून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मंगळवारी अनुषंगाने त्यांनी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले. 

या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुद्धा प्रशासनाकडून टॅब उपयुक्त आहे अशा प्रकारचे सादरीकरण करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही 2014 पासून लॅपटॉपची मागणी करत आहोत.

सर्वच प्रकारच्या कामांमध्ये टॅब उपयुक्त पडत नाही काही कामांसाठी लॅपटॉपची गरज असते, हे कृषिमंत्र्यांना पटवून सांगितले. दरम्यान कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी पाहता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्मचाऱ्यांना नाराज करू नका.

त्यांना गाव पातळीवर काम करावे लागते. त्यांची अडवणूक करणे बरोबर नाही, असे स्पष्ट केले आणि या बैठकीत कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्यावर शिक्कामोर्तब झाले. थोडक्यात आता राज्यातील कृषी विभागातील सुमारे 13000 कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहे.

प्रति लॅपटॉप साठ हजार रुपये खर्च गृहीत धरता या कर्मचाऱ्यांसाठी 79.65 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान कृषी विभागातील दहा हजार 620 सहाय्यक कृषी अधिकारी, 1770 उप कृषी अधिकारी आणि 885 मंडल कृषी अधिकारी अशा एकूण 13,275 कर्मचाऱ्यांना लॅपटॉप दिला जाणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कृषी मंत्र्यांनी लॅपटॉप देण्याच्या आदेश दिले असल्याने आता लवकरात लवकर याचे वितरण झाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News