Mhada News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहर आहे. इथे राहणं, खाणं, पिणं सारं काही महाग झाल आहे. मुंबईत घरांना प्रचंड मागणी आहे आणि किमतीही तेवढ्याच अधिक. येथील घर जेवढी उंच आहेत तेवढ्याच किमतीही उंच आहेत.
त्यामुळे मुंबईत घर घेणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनत चालली आहे. हेच कारण आहे की सर्वसामान्य जनता मुंबईत घर घ्यायचे स्वप्न म्हाडा सारखे एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण करतात.

दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाकडून गेल्या काही वर्षांमध्ये विविध गृह प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. या पुनर्विकास प्रकल्पांमुळे स्थानिक रहिवाशांना आधीच्या तुलनेत मोठी घर आणि प्रगत सुविधा मिळाल्या आहेत. तसेच या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विक्रीसाठी काही घरे उपलब्ध झाली आहेत.
यामुळे सर्वसामान्य जनतेचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न यातून पूर्ण होत आहे. दरम्यान आता म्हाडा मुंबई मंडळाने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील काळाचौकीचा पुनर्विकास केला जाणार आहे. दरम्यान या पुनर्विकास प्रकल्पासाठी तीन बड्या कंपन्यांनी रस दाखवला आहे.
यामुळे हा पुनर्विकासाचा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकल्पानंतर स्थानिक रहिवाशांना तिप्पट मोठी घर मिळणार असल्याचा दावा केला जातोय. खरे तर या पुनर्विकास प्रकल्पासाठी नुकतीच तांत्रिक निविदा जाहीर करण्यात आली आहे.
या निविदा प्रक्रियेत ओबेरोय समुह, महिंद्रा लाइफ स्पेस आणि एमजीएम अॅग्रो या तीन कंपन्यांची नाव दिसली आहेत. आता या टेंडर प्रक्रियेचा पुढील टप्पा स्क्रूटीनीचा राहणार आहे. यानंतर मग याच्या आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काळाचौकी वसाहतीत 133593 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. येथे 48 इमारती असून 208 चौरस फूट क्षेत्रफळाची 3410 घरे आहेत. दरम्यान येथील रहिवाशांना पुनर्विकास झाल्यानंतर त्यांच्या सध्याच्या घरांपेक्षा तिप्पट मोठी घर मिळणार आहेत.
यामुळे जवळपास 15 हजार लोकांना दिलासा मिळणार आहे. या पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन होणाऱ्या घरांचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फुट इतक असेल. दरम्यान या पुनर्विकास प्रकल्पासाठी जो विकासक नियुक्त होईल त्यालाच येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करावी लागणार आहे.