महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अमळनेर – बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण, उद्घाटनाचा मुहूर्त पण ठरला

Published on -

Railway News : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या प्रकल्पाची भेट मिळणार आहे. येत्या काही दिवसांनी राज्यातील एका नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. पुणे विभागातील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

खरेतर, अहिल्यानगर-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याची लांबी 261 किलोमीटर असून, प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जात आहे. याचा पहिला टप्पा अहिल्यानगर-आष्टी आधीच कार्यान्वित करण्यात आला आहे.

तसेच आता याचा दुसरा टप्पा अमळनेर-बीड पण पूर्ण करण्यात आला आहे. तसेच याचा तिसरा टप्पा अर्थात बीड-परळी वैजनाथ याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होणार असा अंदाज आहे. अमळनेर – बीड हा 67.78 किलोमीटरचा मार्ग आहे.

आता याचे काम पूर्ण झालय. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, आता थेट अहिल्यानगर ते बीड रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या नव्या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आहे.

सरकारने या मार्गाचे उद्घाटन येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अशी माहिती दिली आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनानंतर लवकरच या मार्गावर डेमो रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावर जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड अशी पाच नवी स्थानके उभारण्यात आली आहेत.

या स्थानकांमुळे परिसरातील गावांचा विकास होण्यास आणि त्यांना थेट शहरांशी जोडले जाण्यास मदत होईल. सुरक्षित आणि किफायतशीर रेल्वे प्रवासामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

या टप्प्यात 15 मोठे पूल, 90 छोटे पूल, 15 रोड ओव्हर ब्रिज आणि 31 रेल्वे अंडर ब्रिज बांधण्यात आले आहेत. या कामासाठी तब्बल 1286 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याने या संबंधित भागातील विकासाला चालना मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe