Pune News : म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी म्हाडा कडून घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडा पुणे मंडळाने नुकतीच 2025 सालातील घरांच्या मोठ्या लॉटरीची घोषणा केली आहे. म्हाडाने 6168 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यापैकी 1982 घरे प्रथम येणाऱ्या प्रथम प्रधान या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुण्यात घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा स्थितीत म्हाडाच्या या लॉटरीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यातील काही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अर्थात या घरांसाठी जे आधी अर्ज करणार त्यांना घर मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध झालेली घरे सर्व उत्पन्न गटांसाठी आहेत.
अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) या सर्व गटांतील नागरिकांना या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.
कुठे आहेत ही घरे
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरे पुणे मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध भागांमध्ये उपलब्ध आहेत. चाकण-म्हाळुंगे-इंगळे, सोलापूर-शिवाजीनगर, सांगली-संजयनगर-पलूस-अभयनगर, कोल्हापूर-कागल, सांगली-कर्नाळा रोड, सोलापूर-पंढरपूर तसेच जुळे सोलापूर येथे ही घरे उपलब्ध आहेत.
यासाठी म्हाडा कडून स्वातंत्र जाहिरात निघणार नाही. इच्छुकांनी थेट ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. lottery.mhada.gov.in आणि bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवरून इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे.
या लॉटरी बाबत सर्व प्रकारची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामुळे इच्छुकांनी वेबसाईटवर जाऊन या लॉटरीचा संपूर्ण तपशील जाणून घेणे अति आवश्यक आहे.
लॉटरीचे वेळापत्रक कसे आहे?
अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 31 ऑक्टोबर
RTGS/NEFT सह अनामत रक्कम सादर करण्याची शेवटची दिनांक – एक नोव्हेंबर
अंतिम यादी कधी जाहीर होणार -17 नोव्हेंबर
संगणकीय सोडत कधी निघणार – 21 नोव्हेंबर