Ahilyanagar News : ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. अहिल्यानगर मध्ये देखील गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला. पण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. तज्ञांनी 16 – 18 सप्टेंबर दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे राज्यात आजपासूनच पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

गत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर भागात आज सकाळपासून रिपरिप सुरू आहे. तसेच पुढील आठवडाभर म्हणजेच 13-18 सप्टेंबर दरम्यान राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे पडणार पाऊस
मुंबई
ठाणे
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
कोल्हापूर
सांगली
सातारा
अहमदनगर
लातूर
नांदेड
बीड
परभणी
हिंगोली
यवतमाळ
या ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड वाढला होता.
पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय व उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. पण सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक कोंडी, तसेच शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
महत्वाची बाब म्हणजे फक्त आपल्या राज्यातच नाही तर देशातील 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.