Pm Kisan Yojana : अलीकडेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. ट्रॅक्टर व कृषी यंत्रांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ट्रॅक्टरच्या किमती साठ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात असा अंदाज आहे.
दरम्यान दिवाळीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

ही योजना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झाली होती. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत. योजनेचा विसावा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून दोन ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता जमा केला.
खरे तर विसावा हप्ता जमा होण्यास थोडासा उशीर झाला होता आणि म्हणूनच आता 21 वा हफ्ता नेमका कधी येणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आत याचा संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार असल्याने या योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी या योजनेचा पैसा मिळत असतो. गेल्यावर्षी 5 ऑक्टोबरला पैसे मिळाले होते.
2022 मध्ये 17 ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले होते. तसेच यावर्षी 20 ऑक्टोबरच्या आधी पैसे मिळू शकतात. दिवाळी 20 ऑक्टोबरला असल्याने त्याच्या आधीच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत.
बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आचार संहिता लागू होण्याआधी या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
निवडणूक आयोग सप्टेंबर अखेर याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करू शकतो असा अंदाज आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरण थांबणार असल्याने ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाणार आहे.