Hyundai Car Price : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना ह्युंदाई कंपनीचे कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची असेल. कारण की कंपनीने आपल्या एका लोकप्रिय गाडीवर हजारो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनीने सहा लाखांच्या गाडीवर तब्बल साठ हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. यामुळे सध्या या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर अलीकडेच केंद्रातील सरकारने काही मोटरसायकल आणि कार वरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. 1300 सीसी व चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या गाड्यांचा जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 22 तारखेपासून होणार आहे. दरम्यान या निर्णयाची घोषणा होण्याआधी पासून हुंदाई कंपनीकडून आपल्या एका लोकप्रिय गाडीवर हजारो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने सप्टेंबरसाठी त्यांच्या काही निवडक कारवर डिस्काउंट जाहीर केले आहे. या महिन्यात ग्राहकांना कार्सच्या किंमती कमी झाल्याचा व GST कपातीचा फायदा मिळत आहे. GST कपातीची घोषणा झालीये पण कोणत्या कारवरील जीएसटी किती कमी झालीये आहे याची अचूक माहिती तुम्हाला फक्त डीलर्सकडूनच मिळणार आहे. दुसरीकडे GST कपाती सोबतच कंपनी त्यांच्या एंट्री लेव्हल हॅचबॅक ग्रँड आय10 निओसवर मोठा डिस्काउंट देत आहे. याच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5,98,300 रुपये आहे. आता आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कशी आहे डिस्काउंट ऑफर?
कॅशबॅक – 25000
स्क्रॅपेज बोनस – 30000
प्राइड ऑफ इंडिया डिस्काउंट – 5000
कोणत्या मॉडेलवर किती सवलत ?
कंपनी या कारच्या आयआरए पेट्रोल व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. तसेच कंपनी याच्या एमटी आणि एएमटी ट्रिम (नॉन-सीएनजी) वर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. सीएनजी व्हेरिएंटवर सुद्धा 60 हजार रुपयांचा फायदा मिळतं आहे. तरीही या ऑफर बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत डीलरला भेट देणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जीएसटी कमी झाल्याने कारची किंमत 22 सप्टेंबरपासून आणखी कमी होणार आहे.