आज पासून फोनपे, गुगलपेच्या नियमात झाला मोठा बदल ! आता ग्राहकांना एका दिवसात….

Published on -

UPI Rule Change : यूपीआयने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. जर तुम्हीही यूपीआयने पेमेंट करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरतर आज पासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल झाला आहे.

एन पी सी आय ने यु पी आय चे ट्रांजेक्शन लिमिट वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठे व्यवहार करताना फारशी अडचण भासणार नाही असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनपीसीआयने मोठ्या व्यवहारांची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एनपीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता व्हेरिफाइड मर्चंटसोबत एका दिवसात 10 लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.

सद्यस्थितीला फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा पेमेंट एप्लीकेशनच्या वापर प्रचंड वाढला आहे. या अशा पेमेंट अँप्लिकेशनच्या वापरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत. आता सर्वसामान्य फक्त एका क्लिकवर कोणाशीही पैशांची व्यवहार करू शकतात.

पण सर्वसामान्यांना मोठे व्यवहार करताना प्रचंड अडचणी येत होत्या. त्यांना एकापेक्षा अधिक वेळा ट्रांजेक्शन करावे लागत. मात्र आता ही अडचण दूर होणार आहे. आता व्हेरिफाइड मर्चंटला एका दिवसात दहा लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक, विमा प्रीमियम, क्रेडिट कार्ड बिल, कर्ज ईएमआय याची ट्रांजेक्शन लिमिट वाढवण्यात आली आहे. पण दोन व्यक्तींमधील पर्सन-टू-पर्सन व्यवहाराची मर्यादा मात्र पूर्ववत आहे.

अर्थात पर्सन टू पर्सन व्यवहार करायचा असल्यास दिवसाला एक लाख रुपयाचे पेमेंट करता येणार आहे. अर्थात व्यक्तिगत व्यवहार हे आधीप्रमाणेच होत राहतील. UPI अ‍ॅप्सच्या दैनंदिन किंवा तासिक मर्यादा देखील कायम राहतील, त्यामुळे यूजर्ससाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे.

क्रेडिट कार्ड बिल भरायच असल्यास आता एका दिवसात सहा लाख रुपये भरता येतील. वन टाइम ट्रांजेक्शन पाच लाख रुपये करता येईल. तसेच प्रवासाशी संबंधित पेमेंट असेल तर वन टाइम 5 लाख रुपये ट्रांजेक्शन करता येईल.

कर्ज आणि EMI पेमेंटची मर्यादा आता प्रति व्यवहार 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच एका दिवसात जास्तीत जास्त 10 लाख रुपये भरता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe