Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना अलीकडेच एक मोठी भेट दिली. गेल्या वर्षी सुरु झालेल्या लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना उशिरा का होईना पण ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर होत असल्याने योजना बंद झाली की काय असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले आहेत. ऑगस्टचे 1500 रुपये सप्टेंबर मध्ये खात्यात जमा झाले आहेत.

आता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचे आतुरता आहे. ऑगस्ट चे पैसे सप्टेंबर मध्ये मिळाले असल्याने आता सप्टेंबर चा पैसा नेमका कधी येणार हा प्रश्न आहे. दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
खरे तर येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. यामुळे नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला गेला पाहिजे अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
पण गेल्या काही महिन्यांचा अनुभव पाहिला असता या महिन्याचे पैसे देखील थोड्या उशिरानेच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील. सप्टेंबरचा हफ्ता साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो.
जर या महिन्यात पैसे मिळाले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर मध्ये मिळाले आहे. यामुळे सप्टेंबर चा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारून चालत नाही.
पण तरीही मीडिया रिपोर्ट मध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असा अंदाज देण्यात आला आहे.
पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा करणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
या महिन्यात नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार असल्याने या उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यातील महिलांना नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे.