Mobile Showroom : नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. नवयुवक तरुण व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवतात.
अशा स्थितीत जर तुम्हालाही नवा व्यवसाय सुरू करायचा असेल पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नसेल तर तुमच्यासाठी आजचा लेख खास राहणार आहे. कारण आज आपण मोबाईल दुकानाच्या व्यवसायाबाबत माहिती पाहणार आहोत.

आज सर्वत्र मोबाईलची मागणी वाढली आहे. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांकडे मोठमोठे स्मार्टफोन पाहायला मिळतात. आजचे हे युग स्मार्टफोनचे युग आहे. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत त्यामुळे मोबाईलचा वापर सुद्धा वाढत आहे.
प्रत्येक आर्थिक कामांसाठी मोबाईलची आवश्यकता असते. यूपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी देखील स्मार्टफोन आवश्यक असतो. अशा स्थितीत मोबाईलची मागणी सातत्याने वाढत असून मोबाईल दुकानाचा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
मोबाईल विक्री सोबतच तुम्ही मोबाईल रिपेरिंग चे सुद्धा काम करू शकता. शिवाय सेकंड हॅन्ड मोबाईल खरेदी करून तो परत ग्राहकांना चांगल्या किमतीत विकू शकता.
मोबाईलच्या ॲक्सेसरीजला सुद्धा बाजारात मागणी असते यामुळे तुम्ही दुकान सुरू केल्यानंतर ॲक्सेसरीज सुद्धा विकू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकणार आहात.
किती गुंतवणूक करावी लागणार?
मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुमच्याकडे किमान तीन लाखांची जमापुंजी असणे आवश्यक आहे. पण तुमचे दुकान हे बाजारपेठ आहेत किंवा गर्दीच्या ठिकाणी असायला हवे. मार्केटमध्ये, कॉलेज स्टॉप जवळ किंवा बस स्टॅन्ड जवळ तुम्ही तुमचे शोरूम उघडू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा व्यवसाय जीएसटी रजिस्टर करावा लागेल. यासोबतच तुम्हाला बिजनेस रजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या मोबाईल ब्रांड सोबत संपर्क साधावा लागणार आहे.
तुम्हाला मोबाईल विक्री करण्यासाठी ब्रँडकडून डिस्ट्रीब्यूटर कोड घ्यावा लागेल. असे केल्याने तुम्ही त्या संबंधित कंपनीचे मोबाईल अधिकाधिक विकू शकता. यासोबतच तुम्हाला फायनान्सची सुविधा द्यायची असेल तर फायनान्स कोड पण घ्यावा लागेल.
तुम्ही सुरुवातीला तीन लाख रुपयांची गुंतवणूक करून काही निवडक कंपन्यांचे मोबाईलचा आणि ॲक्सेसरीज विकू शकता. तुमचा बिजनेस वाढला की तुम्हाला कॅश फ्लो वाढवून याची व्याप्ती वाढावायची आहे.
नवीन मोबाईल लॉन्च झाल्यानंतर तो मोबाईल तुमच्या दुकानात विक्रीसाठी आला पाहिजे. ग्राहक नवीन मॉडेलचे मोबाईल खरेदी करण्याची इच्छा ठेवतात त्यामुळे ग्राहकांची इच्छा समजून घेऊन तुम्हाला मोबाईल विक्रीसाठी ठेवायचे आहेत. तुमच्या दुकानात ग्राहकांना बसण्यासाठी चांगली जागा पाहिजे.
यासोबतच तुम्हाला मोबाईल रिपेरिंग करणारे कारागीर तसेच वॉरंटी क्लेम सारखी कामे पाहणारी मुले सुद्धा कामाला ठेवावी लागणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर यासाठी तुमच्या शॉप मध्ये मोबाईल रिपेरिंग, ॲक्सेसरीज, स्क्रीन गार्ड इन्स्टॉलेशन सारख्या सुविधा सुद्धा ग्राहकांना द्याव्या लागतील.
व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा योग्यरीत्या प्रचार करावा लागेल. प्रचाराशिवाय अलीकडे व्यवसाय चालवणे कठीण आहे यामुळे सोशल मीडियाचा वापर करून योग्य मार्केटिंग करणे शिकून घ्या.