फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! ऑक्टोबरपासून ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार

Published on -

Maharashtra News : फडणवीस सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या एका कल्याणकारी योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्तिवेतन अशा योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य वाढवण्यात आले आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांना आधी पंधराशे रुपये महिना लाभ मिळत होता. पण आता या संबंधित योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे.

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने त्यांच्याकडील दिव्यांग लाभार्थींच्या लाभात एक हजार रुपयाने वाढ केली आहे. पण या वाढीव निधीचा लाभ फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच मिळणार आहे.

इतर लाभार्थ्यांना आधीप्रमाणेच पंधराशे रुपये महिना लाभ मिळेल. सोलापूर जिल्ह्यात या सर्वच निराधार योजनेचे जवळपास पावणे दोन लाख लाभार्थी आहेत.

त्यातील फक्त आठ ते नऊ हजार लाभार्थी हे दिव्यांग आहेत आणि आता याच दिव्यांग लाभार्थ्यांना सरकारकडून दर महिन्याला 2500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा पाटील यांनी या शासन निर्णयाबाबत अधिक ची माहिती दिली.

पाटील यांनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नव्या निर्णयानुसार, आता निराधार योजनांमधील दिव्यांग लाभार्थींना (महिला व पुरुष) दरमहा अडीच हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले.

तसेच या निर्णयाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील साधारणत: आठ हजार लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होईल अशी सुद्धा माहिती तहसीलदारांनी दिली.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर निराधार योजनांकडे महिलांचा कल कमी झाला होता. पण लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महिलांचा कल निराधार योजनांकडे वळला आहे.

दुसरीकडे आता दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाढवण्याचे जाहीर करण्यात आले असल्याने निराधार योजनांमध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe