Maharashtra Government Employee : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. दरवर्षी दिवाळीच्या सणाला राज्यातील विविध महापालिकांच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते.
राज्य कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस मिळत असतो. यावर्षी सुद्धा राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. द म्युन्सिपल युनियनने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी उपस्थित केली असून यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
दरवर्षी दिवाळीच्या आधी आयुक्तांना सानुग्रह अनुदान वितरित करणे बाबत पत्र पाठवले जाते आणि यंदाही असेच पत्र युनियनकडून पाठवण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी सानुग्रह अनुदान वितरित करण्याबाबत करार केला जात असे. पण आता कराराची पद्धत बंद झाली आहे.
यामुळे आता दिवाळीपूर्वी अनुदानासाठी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले जात आहे. यानुसार यंदा अनुदानासाठी युनियन कडून पत्र पाठवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना 20% रक्कम अनुदान म्हणून वितरित करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे उपस्थित करण्यात आली आहे.
नक्कीच दिवाळीच्या आधी महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना बोनस मिळाला तर सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वर्षानुवर्ष पालिका कर्मचाऱ्यांना विना खंड बोनस दिला जातोय.
यावर्षी पण महापालिका आयुक्त बोनसची घोषणा करणार आहेत. दरम्यान आता त्याआधीच म्युन्सिपल युनियनने सानुग्रह अनुदान विपरीत करण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता लवकरच याबाबत गांभीर्याने विचार होण्याची शक्यता आहे
या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस
कायम कामगार
कर्मचारी
अधिकारी
निरिक्षकीय कर्मचारी
सुरक्षा दल कर्मचारी
आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका
सर्व कंत्राटी कामगार
बहुउद्देशीय कामगार
आरसीएच 2 मधील कर्मचारी
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी
एनयुएचएम तथा डी. एस. एंटरप्राइजेजमार्फत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कार्यरत कर्मचारी
बालवाडी शिक्षिका व मदतनीस