पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला 4700 रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनी किती पैसे मिळणार?

Published on -

Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी सर्वजण कुठे ना कुठे गुंतवणूक करतात. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणी सुद्धा गुंतवणूक करतात.

पण अनेकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक चांगला परतावा मिळत असतानाही नको असते. जर तुम्हालाही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची नसेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक पैसे गुंतवत आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमधून नागरिकांना चांगले व्याज मिळते. दरम्यान आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

यात प्रत्येक महिन्याला 4700 गुंतवले तर मॅच्युरिटी वर किती पैसे मिळणार? या योजनेत गुंतवणूकदारांना किती व्याज मिळते अशा बाबी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

कशी आहे पोस्टाची आरडी योजना ?

पोस्ट ऑफिसकडून विविध बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरडी एक अशीच लोकप्रिय योजना आहे. ही एक 60 महिन्यांची म्हणजेच पाच वर्षांची योजना आहे. या योजनेत प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते.

जर आपणास सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असेल तर तुम्ही या योजनेत नक्कीच गुंतवणूक करायला हवी. पोस्ट ऑफिस ची आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7% व्याज दिले जात आहे.

या वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. यावर्षी रेपो रेटमध्ये आरबीआयकडून एक टक्क्यांची कपात करण्यात आली असल्याने देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी केले आहे.

पण पोस्टाच्या बचत योजनांचे व्याजदर आजही कायम आहे. अशा स्थितीत जर आपण सुरक्षित गुंतवणुकीच्या प्रयत्नात असाल तर पोस्टाची ही योजना तुमच्यासाठी बेस्ट राहील.

या योजनेत तुम्ही दरमहा 4700 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 60 महिन्यांनी तीन लाख 35 हजार 421 रुपये मिळतील. यात दोन लाख 82 हजार तुमची गुंतवणूक असेल.

बाकीचे 53,421 रुपये तुम्हाला व्याज म्हणून या योजनेतून रिटर्न मिळतील. अर्थात तुमच्याकडे एक रकमी पैसा नसेल तर तुम्ही या योजनेत प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून मोठा फंड तयार करू शकता. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News