School Holiday : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण दक्षिण भारतात या उत्सवाची बातच काही और असते.
आपल्याकडे ज्याप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो तसाच नवरात्र उत्सव दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.

दरम्यान याच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळी सणापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांना 17 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सुट्टी दिवाळीची नसून नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या निमित्ताने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करता येणार आहे.
परंतु ही सुट्टी आपल्या महाराष्ट्रातील शाळांना राहणार नाही. आपल्या शेजारील राज्य कर्नाटकात ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून यामुळे तेथील शालेय विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करता येणार आहे.
पण ही सुट्टी जाहीर करतानाच दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात येईल अशी माहिती सुद्धा शासनाकडून देण्यात आली आहे. दक्षिण भारतात नवरात्र उत्सवाला मोठ महत्त्व देण्यात आला आहे.
दरवर्षी दक्षिण भारतात नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. याच अनुषंगाने यावर्षी कर्नाटक राज्यातील सर्वच शाळांना 17 दिवसांची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
आंध्र प्रदेश राज्याने देखील 24 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तेलंगणात सुद्धा 21 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मात्र नवरात्र उत्सव निमित्ताने सुट्टी देण्यात आलेले नाही. आपल्याकडे दिवाळीच्या दिवसांमध्ये सुट्टी राहील. 13 ऑक्टोबर पासून दोन नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.