Maharashtra News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या होत्या.
गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या होत्या. आता ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यातील कर्मचाऱ्यांना चार दिवसांच्या शासकीय सुट्ट्या मिळणार आहेत.

ऑक्टोंबर महिन्यांतील सुट्टींची यादी सार्वजनिक सुट्ट्या 2025 च्या शासन अधिसुचनेत नमुद आहेत. आता आपण पुढील महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना किती दिवस शासकीय सुट्ट्या राहणार याची माहिती जाणून घेऊयात.
पुढील महिन्यात दसरा, दिवाळी निमित्ताने अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. ऑक्टोबरमध्ये किती दिवस सुट्ट्या राहतील? याबाबत साऱ्यांना जाणून घ्यायचे आहे.
अशा स्थितीत जर तुमचाही पुढच्या महिन्यात सुट्टीचा प्लॅन असेल तर आधी किती दिवस शासकीय सुट्ट्या आहेत याची माहिती तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.
2 ऑक्टोबर – दरवर्षी गांधी जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी असते. यावर्षी पण गांधी जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी राहणार आहे.
21 ऑक्टोबर – या दिवशी दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन निमित्ताने शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शासकीय सुट्टी दिली जाते यंदाही ही सुट्टी लागू करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील सर्वच शासकीय आणि निम शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे.
22 ऑक्टोबर – या दिवशी दिवाळी बलिप्रतिपदा निमित्ताने शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बलिप्रतिपदा निमित्ताने दरवर्षी शासकीय कार्यालयांना सुट्टी मिळते. यंदा पण दिवाळीच्या काळात या दिवशी सुट्टी राहणार आहे.