Zodiac Sign : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात काही लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांच्या चालीमुळे काही राशीच्या लोकांचे आयुष्य बदलणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी तसेच नक्षत्र परिवर्तन करत असतात.
वेळोवेळी नवग्रहातील ग्रह आपली चाल बदलतात. पुढील महिन्यात शुक्र ग्रह देखील वेळोवेळी चाल बदलणार आहे. याचा सर्वच मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळेल.

शुक्र ग्रह 6 ऑक्टोबर रोजी उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. नंतर नऊ ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करेल.
पुढे 17 ऑक्टोबरला हस्त नक्षत्रात, मग 28 ऑक्टोबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. अशा पद्धतीने तो आपली चाल बदलणार आहे. या बदलाचा अनेक राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांचा वाईट काळ कायमचा दूर होणार आहे. या काळात अचानक धनलाभ होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल.
कुटुंबात अगदीच आनंदाचे वातावरण राहील. तरुण मंडळी आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करतील. नवीन इनकम सोर्स सापडतील. पैशांच्या बाबतीत हा काळ फायद्याचा राहील.
धनु राशीसाठीही हा काळ लाभदायक असेल. या राशीतील लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. हे लोक दूरवरचे प्रवास करणार आहेत. या काळात मालमत्ता खरेदी करण्याचे योग तयार होत आहेत.
या लोकांच्या भौतिक सुख सोयी वाढणार आहेत. शेअर बाजार व लॉटरी सारख्या ठिकाणातून यांना चांगली कमाई होऊ शकते. या लोकांना नशिबाची परिपूर्ण साथ राहणार आहे.
मेष राशीच्या लोकांना सुद्धा शुक्र ग्रहाच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाचा फायदा होणार आहे. या लोकांचेही उत्पन्न वाढणार आहे. बँक बॅलन्स चांगले होईल. दूरवरचे प्रवासाचे योग आहेत.
प्रवासातून काहीतरी चांगली गोष्ट साध्य होईल. कुटुंबातील संबंध चांगले होणार आहेत. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठानकडून आणि कनिष्ठांकडून चांगली मदत मिळणार आहे.