DA Hike : केंद्र आणि राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे.
आधी मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्के झाला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 55 टक्के करण्यात आला. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
यानुसार आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल. ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.
अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढेल.
दरम्यान आता आपण दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% होणार असल्याने DA वाढीनंतर त्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
किती वाढणार पगार?
अठरा हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना 55% दराने 9900 महागाई भत्ता मिळतोय. नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन असणाऱ्या पेन्शन धारकांना 55 टक्के दराने 4950 रुपये पेन्शन मिळत आहे.
जेव्हा महागाई भत्ता 58% होईल तेव्हा अठरा हजार बेसिक पगार असणाऱ्यांना दहा हजार 440 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच 9000 रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्या पेन्शन धारकांना 58% दराने 5220 पेन्शन मिळणार आहे.
अर्थात 18 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 540 रुपयांनी वाढणार आहे. 9000 पेन्शन असणाऱ्या पेन्शन धारकांचे निवृत्तीवेतन 270 रुपयांनी वाढणार आहे.
कधी वाढणार महागाई भत्ता?
DA वाढीचा अधिकृत निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. दिवाळीच्या आधी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब होईल. ऑक्टोबर महिन्यात शासन निर्णय निघेल आणि त्याच महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. सणासुदीच्या हंगामात नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.