ST News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याच प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या नव्या योजनेमुळे आता प्रवाशांना महाराष्ट्रभर स्वस्तात प्रवास करता येणार आहे.
नव्या योजनेचा महिलांना तसेच विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण राज्यमार्ग परिवहन महामंडळाची नवीन योजना नेमकी कशी आहे आणि याचा कोणाला लाभ होणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

एस टी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. सोबतच ज्येष्ठ नागरिकांना एसटी तिकीट दरात 100% सवलत दिली जात आहे.
मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आता एक विशिष्ट ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या या ओळखपत्राशिवाय आता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत मिळणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
योजनेत पारदर्शकता वाढावी यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचा युक्तिवाद केला जातोय. पण महामंडळाच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाचा आता महामंडळाकडून प्रवाशांसाठी एक विशेष एसटी पास योजना सुरू करण्यात आली आहे.
या पासचा वापर करून सर्वसामान्य प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येणार आहे. हा पास प्रवाशांना फक्त 585 रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि याचा वापर करून प्रवासी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करू शकतील.
या पासच्या मदतीने प्रवाशांना चार दिवसांचा मोफत प्रवास करता येणार आहे. हे चार दिवस प्रवाशांना महाराष्ट्रभर अमर्याद प्रवास करता येणार आहे. या योजनेचा सर्वच प्रवाशांना लाभ मिळणार आहे.
विशेषता जे प्रवासी सणासुदीच्या हंगामात बाहेर पिकनिक साठी जाणार आहेत अशा प्रवाशांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र, निसर्गरम्य ठिकाण या पासमुळे सहजतेने एक्सप्लोर करता येणार आहेत.
हा पास कोणत्याही साध्या आणि निम आराम बसेस मध्ये चालेल. धार्मिक यात्रेकरू, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व ज्यांना कमी खर्चात एसटीचा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.
तुम्हाला हा चार दिवसीय पास काढायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील एसटी आगारात जाऊन हा पास सहज काढू शकता. रोख पैसे देऊन किंवा UPI ने पेमेंट करून तुम्ही हा पास काढू शकता. या नव्या योजनेमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.