Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठमोठी महामार्गांचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग सुद्धा तयार होत आहेत. अलीकडेच राज्याला एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळाली आहे.
नगर ते बीड दरम्यान नुकतीच रेल्वे सेवा सुरू झाली आहे. सोबतच राज्यात नवनवीन विमानतळ सुद्धा तयार केले जात आहेत. पुण्यातही एक भव्य विमानतळ तयार केले जाणार आहे.

लोहगाव विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी पुण्यात नव विमानतळ तयार होत आहे. हे नवविमानतळ पुरंदर तालुक्यात विकसित केले जात असून याच विमानतळ प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सरकार कटीबद्ध असून आता या विमानतळासाठी काही कठोर निर्णय घेतले जाणार आहे. शासनाकडून या विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन सक्तीने करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.
या प्रकल्पासाठी सरकारकडून आकर्षक मोबदला दिला जातोय यामुळे आतापर्यंत 2250 एकर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. पण आजही असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिलेल्या नाहीत.
त्यामुळे या प्रकल्पाचे भूसंपादन अजूनही रखडलेलेच आहे. पण आता या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.
या डेडलाईनच्या कालावधीत जे शेतकरी आपली जमीन देणार नाहीत त्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिलेल्या तारखेपर्यंत जमीन संपादनासाठी संमती दिली नाही तर सक्तीने जमिनीचे संपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 2200 शेतकऱ्यांनी संमती दाखवली आहे.
या शेतकऱ्यांकडून 2250 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. पण अजूनही प्रकल्पासाठी 750 एकर जमिनीची आवश्यकता आहे. महत्वाचे म्हणजे समती बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना फक्त दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीत शेतकऱ्यांनी संमती दिली नाही तर त्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. सक्तीच्या भूसंपादनात जमिनीच्या चारपट मोबदला देण्यात येईल पण यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. कारण त्यांना दहा टक्के अतिरिक्त मोबदला मिळणार नाही.