Government Decision : नव्याने जन्म – मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या तसेच आधीच जन्म – मृत्यू प्रमाणपत्र काढलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या अंतर्गत राज्यातील काही लोकांचे जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
मार्च 2025 मधील निर्णयानुसार आता जन्ममृत्यु नोंदी घेण्याची नवीन कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र सरकारने जन्म मृत्यू अधिनियम 1969 मध्ये सुधारणा केली आहे.

या सुधारणेनंतर विलंबित जन्म मृत्यूचे दाखले देण्याचे काम जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदरांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे जर जन्म मृत्यू नोंदी इतर कोणी केले असतील तर त्या नोंदी संशयास्पद असू शकतात.
आता जन्ममृत्यू नोंदीसाठी एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर अर्ज केले आणि हे प्रमाणपत्र तहसीलदरांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असेल तर ते प्रमाणपत्र रद्द होणार आहे. खरे तर जन्म केव्हा मृत्यू प्रमाणपत्रासाठी 21 दिवसांच्या आत अर्ज करावा असा नियम आहे.
मात्र मुदतीत अनेक जण अर्ज करत नाहीत. अनेक जण एका वर्षानंतर अर्ज करतात. पण एका वर्षानंतर अर्ज करायचा झाल्यास हा अर्ज जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांकडे करावा लागतो.
कारण याच लोकांना एका वर्षानंतर जन्म तसेच मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे.
शासनाला जन्म मृत्यूचे अनेक दाखले बनावट असल्याचा संशय आहे. यामुळे आता शासनाने एका वर्षानंतर जन्ममृत्यु नोंदी साठी अर्ज केलेल्या आणि तहसीलदारापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शासन निर्णयानुसार, फक्त जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदाराकडूनच जन्म-मृत्यूचा दाखला मिळवावा लागेल. याचसोबत त्यासाठी ठरावीक वेळेत अर्ज करावा लागणार आहे.
थोडक्यात जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी एका वर्षानंतर अर्ज करण्यात आलेला असेल आणि तहसीलदारापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून असे प्रमाणपत्र मिळाले असेल तर ते प्रमाणपत्र आता रद्द होणार आहे.
अशा लोकांना आता पुन्हा एकदा नव्याने जन्ममृत्यू नोंदीसाठी अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे करावा लागेल.