आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?

Published on -

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

सातवा वेतन आयोगाला आता जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे.

सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू आहे. यामुळे नवा आठवा वेतन आयोग 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. पण अजून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही.

TOR निश्चित झालेले नाही. अध्यक्ष तसेच सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रमाची स्थिती तयार झालीये. पण तरीही नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणाचा पगार कितीने वाढणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

आज आपण तीस हजार, पन्नास हजार 80 हजार बेसिक पगार असणाऱ्यांना किती पगारवाढ मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

पगारात किती वाढ होणार?

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 असू शकतो. त्यानुसार तीस हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27 हजार 600 रुपयांचे पगार वाढ मिळणार आहे. 30000×1.92 = 57 हजार 600 रुपये बेसिक पगार होणार आहे.

50 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 96 हजार रुपये होणार आहे. अर्थात बेसिक पगारात 46 हजार रुपयांची वाढ होईल. 50000×1.92 = 96 हजार रुपये.

80 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख 53 हजार 600 रुपये पगार मिळणार आहे. अर्थात बेसिक पगार 73 हजार 600 रुपयांनी वाढणार असा अंदाज आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News