जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का? समोर आली मोठी माहिती

Published on -

Gas Cylinder Price : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिवाळीच्या आधी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना डबल बोनस मिळणार अशी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी मध्ये मोठा रिफॉर्म येणार असे म्हटले होते.

यानुसार सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी 56 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली आहे. दैनंदिन वापरातील अनेक अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे काही वस्तूंवरील जीएसटी चक्क शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी सरकारकडून शून्य करण्यात आला आहे.

यामुळे सर्वसामान्य मध्यमर्गीयांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. 12% आणि 28% हे जीएसटीचे दोन स्लॅब सरकारने रद्द केले आहेत.

आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोन स्लॅब शिल्लक आहेत. पण जीएसटीचे नवीन रेट 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. जीएसटीचे नवीन रेट लागू झालेत की अन्नपदार्थांपासून कार, एसी, टीव्ही अशा वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच आता गॅस सिलेंडरच्या रेट बाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे मग गॅस सिलेंडरवरील जीएसटी पण कमी करण्यात आला आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

22 सप्टेंबर पासून अनेक जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता 22 सप्टेंबर नंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का असा प्रश्न विचारत आहे. सोशल मीडियामध्ये देखील या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

पण सरकारने गॅस सिलेंडरवरील जीएसटीमध्ये कोणताचं बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरवर पाच टक्के जीएसटी आकारला जातोय. त्याचवेळी निळ्या सिलेंडरवर म्हणजेच 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरवर 18% जीएसटी आकारला जात आहे.

दरम्यान जीएसटी कौन्सिलने गॅस सिलेंडर वरील जीएसटी कमी केलेला नाही. यामुळे आता जे दर आहेत तेच 22 सप्टेंबर नंतरही कायम राहणार आहे. यामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीत जीएसटीमुळे कोणताच बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe