Railway News : गत काही वर्षांमध्ये रस्त्यांचे अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाली आहेत. रस्त्यांसोबतच रेल्वेचे हे अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे अजूनही रेल्वेच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
दरम्यान आता रेल्वे कडून पालघर जिल्ह्यात सात नवीन रेल्वे स्थानक विकसित केली जाणार आहेत. पश्चिम रेल्वे कडून डहाणू – विरार रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

याच प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्ह्यात सात स्थानक तयार होणार आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेने थेट डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आता पश्चिम रेल्वेने डहाणू-विरार रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली आहे.
गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढला आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढली असून, प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे.
वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने डहाणू-विरार चौपदरीकरणासोबत नवीन स्थानकांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात स्थानकांमध्ये वाढीव, सुरतोडी, माकुणसार, चिंटू पाडा, पांचाली, वंजारवाडा आणि बीएसईएस कॉलनी यांचा समावेश आहे.
हा दोन ट्रॅकचा मार्ग आहे. त्यावरून प्रवासी व मालगाड्या दोन्ही धावतात. वाढत्या गाड्यांमुळे या ट्रॅकवर ताण निर्माण झाला आहे. प्रवाशांना वेळेवर गाड्या न मिळणे, वेळापत्रकातील बदल आणि प्रचंड गर्दी या समस्या कायम आहेत.
चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन ट्रॅक फक्त प्रवासी गाड्यांसाठी आणि दोन ट्रॅक मालवाहतुकीसाठी वापरले जातील. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढेल, वेळापत्रकातील शिस्त सुधारेल आणि प्रवासाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. पश्चिम रेल्वेने या प्रकल्पाची पूर्तता 2027 पर्यंत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
डहाणू-विरार चौपदरीकरण आणि सात नवीन स्थानकांची उभारणी पूर्ण झाल्यास, केवळ पालघरच नव्हे तर संपूर्ण मुंबई उपनगरीय प्रवास सुलभ होईल. प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असल्याने येत्या काही वर्षांत त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल घडणार आहे.