Post Office Scheme : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक रिस्की वाटत असेल व सुरक्षित ठिकाणी पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर या वर्षात फिक्स डिपॉझिटचे व्याजदर फारच कमी झाले आहे.
व्याजदरात झालेली घसरण सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. एसबीआय, एचडीएफसी सारख्या जवळपास सर्वच बँकांनी फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर घटवले आहे.

मात्र पोस्ट ऑफिस ने आपल्या बचत योजनांचे व्याजदर आजही कायम ठेवले आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाची एफडी योजना तुमच्यासाठी फायद्याची राहणार आहे.
पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना राबवली जात आहे ज्याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. कारण असे की या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेसारखेच असते.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमीत कमी 6.9 टक्के व्याज मिळते.
तसेच जास्तीत जास्त 7.5% व्याज मिळते. दरम्यान आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पाच वर्षांची योजना?
पोस्ट ऑफिसची 60 महिन्यांची एफडी योजना ग्राहकांना अधिक व्याज देते. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.5% दराने व्याज दिले जात आहे.
अशा स्थितीत जर तुम्ही पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत 15 लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 21 लाख 74 हजार 922 रुपये मिळणार आहेत.
अर्थात सहा लाख 74 हजार 922 रुपये फक्त व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील. पण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांना जेवढे व्याज मिळते तेवढेच सीनियर सिटीजन ग्राहकांना मिळते.
महिलांना सुद्धा तेवढेच व्याज दिले जाते. पण खाजगी तसेच सरकारी बँका सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिक व्याज देतात. एसबीआय सिनिअर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिक व्याज देते.