Ladki Bahin Yojana : गतवर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली. मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मध्यप्रदेशात ही योजना लाडली बहना योजना या नावाने ओळखली जाते.
दरम्यान राज्यात सुरू झालेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत.

योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर मध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल आहे. रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ उचलला असल्याचे समोर आल्यानंतर आता सरकारने लाभार्थ्यांसाठी ई- केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून या अंतर्गत येत्या दोन महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करायची आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी दरवर्षी ई-केव्हायसी करावी लागणार आहे. दरवर्षी जून महिन्यापासून केवायसीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि दोन महिन्यांच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
दरम्यान आता योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने केवायसी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार, केवायसीची प्रक्रिया कुठे करावी लागणार? असे अनेक प्रश्न महिलांकडून उपस्थित केले जात आहेत.
E-KYC कशी करणार?
ई – केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी पूर्ण करायची आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे केवायसीची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकांनी केवायसी केली आहे. केवायसीसाठी तुम्हाला तीच कागदपत्रे द्यावी लागणार आहेत जी तुम्ही अर्ज करताना दिली होती.
आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, रेशन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला केवायसी साठी लागतील अशी माहिती समोर आली आहे. यासोबतच तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता ही माहिती सुद्धा परत भरावी लागणार आहे.
अर्ज करताना जी डॉक्युमेंट्स दिली होती ती डॉक्युमेंट तुम्हाला परत द्यावे लागणार आहेत. दरम्यान ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत दिले जाणारे पंधराशे रुपये मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.