अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर लागणार 4 क्यूआरकोड ! रेशन कार्डमध्ये नाव जोडणे व इतर कामे आता फक्त एका क्लिकवर

Published on -

Ration Card News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी पुरवठा विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नवीन नाव जोडणे यांसारखे अनेक कामे घरबसल्या करता येणार आहेत.

खरे तर महाराजस्व अभियानाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहेत.

यात स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य मिळते का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का, ग्राहकाला आलेला अनुभव क्यूआर कोडच्या माध्यमातून शासनाला कळवला जाणार आहे.

यासोबतच रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नाव जोडणे ही कामे सुद्धा आता घरबसल्या होणार आहेत. यासाठी रेशन दुकानावर चार प्रकारचे क्यू आर कोड लावले जातील अशी माहिती समोर आली आहे. नक्कीच हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायी राहणार आहे. 

जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि तुम्हालाही तुमच्या रेशन कार्ड मध्ये काही बदल करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे. क्यूआर कोडच्या मदतीने रेशन कार्ड धारकांना चार कामे करता येणार आहेत.

रेशन कार्ड धारकांना दुकानातील सेवेविषयी अभिप्राय नोंदवण्यासाठी सुद्धा QR कोडं राहणार आहे. कार्यालय सेवा अभिप्राय फॉर्मच्या माध्यमातून दुकानातील सेवेविषयी अभिप्राय देता येणार आहे. 

रेशन दुकानाला रेटिंग देण्यासाठी सुद्धा क्यूआर कोड राहणार आहे. ग्राहकांना दुकानात कशी वागणूक मिळाली, जास्त पैसे घेतलेत का, काटामारी करण्यात आली का? याबाबत या माध्यमातून शासनाला माहिती देता येणार आहे.  

रेशन दुकानातील धान्य वितरणाची माहिती देण्यासाठी सुद्धा एक क्यूआर कोड असेल. हा कोड स्कॅन करून हक्काचे धान्य मिळतेय का ? वितरणाची तारीख, प्रमाण, पात्रता तपासणे शक्‍य होणार आहे.

रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीसाठी सुद्धा क्यूआर कोड असेल. या क्यूआर कोडच्या माध्यमातून नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेतील नाव वाढविणे व कमी करणे अशा बाबींसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News