Maharashtra Railway : ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. आता दिवाळीच्या आधीच मराठवाड्यातील जनतेसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातून धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
नांदेड रायचूर आणि पूर्णा पटना या दोन रेल्वे गाड्यांचा आता थेट जालना स्थानकापर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

सणासुदीच्या हंगामा आधीच रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याने प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या सदर निर्णयाचा मराठवाड्यातील जालना, परभणी, पूर्णा, नांदेड तसेच परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
मराठवाड्यातील बहुतांशी जनतेला रायचूर व पटनाकडे जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजीया खान यांनी या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या विस्तारासाठी रेल्वे कडे पाठपुरावा केला होता.
दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना डॉक्टर खान यांनी विशेष विनंती केली होती. दरम्यान डॉक्टर खान यांच्या या पाठपुराव्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर गाडी प्रायोगिक तत्त्वावर जालना स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थातच आता ही गाडी जालन्याहून नांदेडला येईल मग पुढे रायचूरकडे सोडली जाणार आहे. तसेच पूर्णा-पटना ही गाडी सुद्धा आता जालना स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयामुळे जालना व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार अशी आशा आहे.
दरम्यान खासदार खान यांनी केलेला पाठपुरावा आता यशस्वी झाला असल्याने त्यांच्या या प्रयत्नांचे सर्व रेल्वे प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे. खान यांच्या पाठपुराव्यासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांचा विस्तार व्हावा यासाठी प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी उपस्थित करण्यात येत होती.
अखेरकार आता खान यांच्या पाठपुराव्यानंतर मराठवाड्यातील प्रवाशांची मोठी मागणी पूर्ण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची आग्रही मागणी गांभीर्याने घेत या दोन्ही रेल्वे गाड्यांचा विस्तार करून मराठवाड्यातील लोकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.