Bank Of Baroda : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा कडून घरासाठी कर्ज काढायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण आज आपण बँक ऑफ बडोदा कडून 52 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतल्यास दहा वर्षांसाठी तसेच वीस वर्षांसाठी किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे याच संपूर्ण गणित या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर या वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली असल्याने देशभरातील बँकांनी कर्जांचे व्याजदर कमी केले आहे. बँक ऑफ बडोदाने देखील गृह कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

त्यामुळे सध्याचा हा काळ गृह कर्ज घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. या काळात गृह कर्ज घेतल्यास सर्वसामान्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. बँक ऑफ बडोदा सद्यस्थितीला 7.45% व्याज दरात गृह कर्ज ऑफर करत आहे.
हा बँकेचा कमीत कमी व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळेल. जर समजा बँक ऑफ बडोदा कडून दहा वर्षांसाठी किमान 7.45% व्याजदरात 52 लाख रुपये गृह कर्ज मंजूर झाले तर 61 हजार 589 हजार रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
अशा तऱ्हेने सदर ग्राहकाला 73 लाख 90 हजार 917 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थात सदर ग्राहकाला 21 लाख 90 हजार 917 रुपये व्याज स्वरूपात बँकेला द्यावे लागतील. जर समजा 20 वर्षांसाठी 52 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 41,732 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.
या प्रकरणात सदर ग्राहकाला 48 लाख 15 हजार 682 व्याज स्वरूपात बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थात जर तुम्ही कर्ज परतफेडीचा कालावधी कमी ठेवला तर तुम्हाला कमी व्याज भरावे लागणार आहे.
पण, कर्ज परतफेडीचा कालावधी कमी असेल तर साहजिकच ईएमआय जास्त राहणार आहे. यामुळे तुम्ही तुमच आर्थिक नियोजन करून अधिकाधिक ईएमआय भरण्याची तयारी दाखवली पाहिजे जेणेकरून तुम्हाला कमी व्याज भरावे लागेल.