Mumbai Railway : देशात लवकरच दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव संपन्न झाला की पंधरा दिवसात दिवाळीला सुरुवात होईल. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय रेल्वे देखील नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून नवनवीन रेल्वे गाड्यांची घोषणा केली जात आहे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून काही विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जाणार आहेत. मुंबईवरूनही रेल्वे प्रशासन काही विशेष गाड्या चालवणार आहे.

मुंबईहून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या काळात लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी 23 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. या विशेष गाडीला 30 सप्टेंबर पर्यंत चालवले जाईल.
या काळात या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे मुंबई नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड यादरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन तब्बल 15 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
या गाडीसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षणाची सुविधा राहणार आहे. आरक्षित नसलेल्या डब्यांसाठीची तिकिटे यूटीएस अॅपद्वारे उपलब्ध करून दिले जातील.
या विशेष गाडीचे भाडे सुपरफास्ट मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी सायंकाळी 16.35 वाजता स्पेशल गाडी सोडली जाणार आहे. तसेच स्पेशल ट्रेन दर सोमवारी रात्री हुजूर साहेब नांदेड येथून रात्री 23.45 वाजता सोडली जाणार आहे.
कोण – कोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी?
ठाणे
कल्याण
इगतपुरी
नाशिक रोड
मनमाड
नागरसोल
रोटेगाव
लासूर
औरंगाबाद
जालना
परतूर
सेलू
मानवत रोड
परभणी
पूर्णा