Gold Rate Prediction:- गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की सोने-चांदीच्या दराने एक लाखाचा टप्पा कधीच पार केला असून सातत्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. मध्यंतरी काही दिवसांमध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली व त्यानंतर मात्र परत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. उदाहरणादाखल जर आपण बघितले तर 20 सप्टेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 12 हजार 740 रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत असल्याचे दिसून आले. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बघितले तर अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 3600 डॉलर पर्यंत पोहोचलेले आहेत. या सगळ्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मात्र येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर दुपटीने वाढण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकन फर्म जेफरीजने केलेला आहे.
अमेरिकन फर्म जेफरीजचा दावा काय?
याबाबत सविस्तर वृत्त असे की अमेरिकन फर्म जेफरीजने सोन्याच्या दरवाढी संबंधित एक दावा केला आहे व त्या दाव्यानुसार बघितले तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत सोन्याची किंमत सहा हजार सहाशे अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून सध्या सुरू असलेला बुल रन म्हणजेच वाढ अशीच सुरू राहिली तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. भूतकाळामध्ये सोन्याचे दर वाढण्याचा जो काही ट्रेंड दिसून आला त्यावरून त्यांनी हा अंदाज बांधला असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. त्यांनी या अहवालामध्ये म्हटले आहे की 1980 या वर्षाच्या जानेवारी महिन्यात सोन्याचे दर अधिक होते व तेव्हा अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 9.9% पर्यंत पोहोचलेलं होतं. म्हणजेच त्यावेळी अमेरिकेचे दरडोई उत्पन्न डॉलर मध्ये बघितले तर ते 8551 डॉलर इतके होते व सोन्याची किंमत प्रति औंस 850 अमेरिकन डॉलर्स इतकी होती. त्या तुलनेमध्ये जर आज बघितले तर अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 5.6% म्हणजेच 66 हजार 100 अमेरिकी डॉलर इतके असून सोन्याची किंमत 3670 डॉलर प्रति औंस इतकी आहे. अशा प्रकारे अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 9.9% पर्यंत पोहोचवायचे असेल तर सोन्याचे दर 6600 पर्यंत जाणे आवश्यक आहे व सध्या त्या ठिकाणी सोन्याचे दर तीन हजार सहाशे सत्तर डॉलर इतके आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर सोन्याचे दर जर 6600 डॉलर पर्यंत पोचले तर सोन्याच्या दरांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.
