Multibagger Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये जर आपण काही दिवसांपासून बघितले तर मोठ्या प्रमाणावर चढउतार असल्याचे दिसून येत आहे व यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूराजकीय तणाव आणि बरीचशी देशांतर्गत परिस्थिती देखील कारणीभूत ठरत आहे. परंतु या अनिश्चिततेच्या कालावधीत देखील अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर ठरताना दिसून येत असून अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर मालामाल केलेले आहे. अगदी एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये देखील गुंतवणूकदारांचे पैसे कित्येक पटींनी वाढलेले आहेत. यामध्ये असाच एक शेअर आहे ज्याने दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 900% इतका रिटर्न दिलेला आहे.
व्हिवियाना पावरटेक लिमिटेड कंपनीचा शेअर ठरला मल्टिबॅगर
व्हिवियाना पावरटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दोन वर्षांमध्ये तब्बल 900 टक्क्यांचा रिटर्न दिला असून सध्या देखील या शेअरच्या किंमतीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जर शुक्रवारी म्हणजेच 19 सप्टेंबर 2025 रोजीचा या शेअरची किंमत बघितली तर त्यामध्ये पाच टक्क्यांची तेजी दिसून आली व बीएसई वर हा शेअर 1458.85 रुपयांवर पोहोचला. जर गेल्या काही वर्षांचा विचार केला तर या शेअरची किंमत फक्त 145 रुपये होती व आता थेट 1450 पेक्षा वरच्या पातळीवर हा शेअर ट्रेड करत आहे. 2023 मध्ये गुंतवणूकदारांना या शेअरने 96% चा परतावा दिला व वार्षिक आधारावर बघितले तर 2024 मध्ये 485% व चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 टक्क्यांची तेजी यामध्ये पाहायला मिळत आहे.

कंपनीला मिळाले आहेत मोठ्या वर्क ऑर्डर्स
सध्या या कंपनीला मध्य गुजरात वीज कंपनी लिमिटेड कडून तब्बल 265 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली असून ही ऑर्डर पुढील 16 महिन्यांमध्ये कंपनीला कम्प्लीट करायची आहे व यामुळे मार्केटमध्ये या शेअर बद्दल गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच ऑगस्ट 2025 मध्ये शेअर बाजाराला माहिती देताना कंपनीने म्हटले होते की, आपल्याकडे 1000 कोटींपेक्षा अधिकच्या वर्क ऑर्डर्स आहेत व तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 920 कोटी रुपयांच्या घरात होते. इतकेच नाही तर या कंपनीला गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कडून 55.36 कोटी आणि पंजाब स्टेट पावर कॉर्पोरेशन कडून 59 कोटींची वर्क ऑर्डर मिळालेली आहे. या सगळ्या वर्कऑर्डरच्या आधारावर जर बघितले तर तज्ञांचे मत आहे की, येणाऱ्या काळामध्ये देखील या शेअरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे व त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरू शकते.