Car Price: सणासुदीत मारुतीची कार घेण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कारच्या किमतीत 1 लाखापेक्षा जास्त कपात…बघा फायद्याची अपडेट

Published on -

Car Price: केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी दरामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला व यामुळे आता देशातील नागरिकांना अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तू स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व हा नक्कीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या जीएसटी दरातील बदलाचा फायदा देशातील ऑटो सेक्टरला देखील झाला असून त्यामुळे अनेक प्रख्यात वाहन निर्माता कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतींमध्ये मोठी कपात जाहीर केलेली आहे व यामध्ये देशातील अग्रगण्य कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने देखील महत्त्वाच्या कारच्या किमतींमध्ये मोठी कपात जाहीर केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारुती सुझुकीने मारुती वॅगनार तसेच आल्टो आणि मारुती इग्निस सारख्या छोट्या कारच्या किमतींमध्ये 1.29 लाख रुपयांपर्यंत कपात केलेली आहे.तसेच या नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू केल्या जाणार आहेत.

मारुती सुझुकीने जारी केले अधिकृत निवेदन

महत्वाचे म्हणजे मारुती सुझुकीकडून याबाबत एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले आहे व त्यामध्ये कंपनीने म्हटले की, जीएसटी दरांमध्ये ज्या काही सुधारणा करण्यात आल्या त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवला जाईल व त्या माध्यमातून कंपनीने आपल्या पोर्टफोलिओतील कारच्या किमतींमध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. या नव्या किमतीच्या घोषणेनंतर आता मारुतीचे सर्वात लोकप्रिय अल्टो K10 ही सर्वात स्वस्त कार राहिलेली नसून तिची जागा आता मारुती एस प्रेसो या कारने घेतलेली आहे व ती आता सर्वात स्वस्त कार ठरणार आहे. कारण कंपनीने या कारच्या किमतीमध्ये एक लाख 29 हजार 600 रुपयांची सर्वात मोठी कपात केली आहे. इतकेच नाहीतर मारुतीने त्यांची लोकप्रिय कार स्विफ्टच्या किमतीमध्ये 84 हजार रुपयांची कपात जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता या कारची सुरवातीची किंमत फक्त पाच लाख 79 हजार रुपये इतकी झाली आहे. तसेच स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल कंपनीने नुकतेच लाँच केले होते व त्या कारची किंमत आता सहा लाख 49 हजार रुपये जाहीर करण्यात आली आहे. तसेच मारुती बलेनोच्या किमतीत 86 हजार 100 रुपयापर्यंत कपात करण्यात आलेली आहे व डिझायरच्या किमतीत देखील 87 हजार 700 रुपयांची कपात केलेली आहे व या कपातीमुळे ही कार आता सहा लाख 26 हजार रुपयांच्या किमती पासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe