Multibagger Stock: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल! गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले 74 लाख

Published on -

Multibagger Stock:- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना जर ती गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या अभ्यासाने केली तर नक्कीच दीर्घ कालावधीमध्ये चांगले रिटर्न या माध्यमातून मिळू शकतात. आपण जर बाजारातील काही शेअर्सचा आढावा घेतला तर आपल्याला दिसून येते की अगदी एका वर्षाच्या कालावधीमध्ये देखील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना छोट्याशा गुंतवणुकीवर लाखोंचा रिटर्न दिलेला आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर एलिटकॉन इंटरनॅशनल या तंबाखू कंपनीच्या शेअर्सनेदेखील गुंतवणूकदारांना भरभरून असा रिटर्न दिलेला आहे. फक्त शेअरची निवड करताना त्यासाठी स्वतःचा या संदर्भातील सांगोपांग अभ्यास आणि तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.

गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले 74 लाख

एलिटकॉन इंटरनॅशनल ही तंबाखू कंपनी असून या शेअर्सला सध्या अप्पर सर्किट लागत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जर आपण बघितले तर जेव्हा मार्केट ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हा हा शेअर्स तब्बल पाच टक्के अप्पर सर्किटवर पोहोचला होता व ट्रेडिंगच्या शेवटी म्हणजेच दिवसा अखेरपर्यंत हा शेअर्स 185.85 रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या एक लाख मूल्याच्या गुंतवणुकीचे तब्बल 74 लाख रुपयांत रूपांतर केले आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना एका वर्षात तब्बल 7304.38% रिटर्न दिलेला आहे. एक वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 2.51 रुपये होती व ती आता 185.85 रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच तीन वर्षांमध्ये या शेअरमध्ये तब्बल 16,757% आणि पाच वर्षात 17600 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एलिटकॉन इंटरनॅशनल कंपनी काय काम करते?

साधारणपणे ही कंपनी 2021 पासून देशामध्ये आणि जागतिक स्तरावर तंबाखू उद्योगात जसे की सिगारेट, धुम्रपान मिश्रण, शिशा आणि इतर संबंधित उत्पादनाची उत्पादन आणि विक्री करण्यास सहभागी आहे. तसेच सिंगापूर,हॉंगकॉंग आणि युके सारख्या विविध देशांमध्ये देखील ही कंपनी कार्यरत आहे. पुढे कंपनीची उत्पादनांमध्ये विस्तार करण्याची योजना असून यामध्ये मॅच स्प्राईट तसेच मॅच बॉक्स, पाईप्स इत्यादी उत्पादनांचा समावेश ही कंपनी करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe