Upcoming IPO: पैसे कमावण्याची मोठी संधी! सप्टेंबरच्या या तारखेला येणार 745 कोटींचा ‘हा’ IPO…नोट करा प्राईस बँड

Published on -

Upcoming IPO:- सप्टेंबर महिन्यांमध्ये अनेक आयपीओ शेअर मार्केटमध्ये आले व या आयपीओच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे आपल्याला दिसून आले. अगदी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या आयपीओच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण 23 सप्टेंबर 2025 रोजी आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर लिमिटेड आयपीओ गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये खुला होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

23 सप्टेंबरला येणारा आनंद राठी शेअर्स स्टॉक ब्रोकर लिमिटेडचा IPO

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 23 सप्टेंबर 2025 रोजी आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर लिमिटेडचा आयपीओ खुला होणार असून 25 सप्टेंबर पर्यंत याकरिता गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी या आयपीओच्या माध्यमातून जवळपास 745 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओ करिता प्रति शेयर 393 रुपये ते 414 रुपयांचा प्राईस बँड निश्चित करण्यात आलेला आहे व 36 शेअरची लॉट साईज आहे. विशेष म्हणजे या आयपीओ मध्ये नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत व लक्षात घेण्याची बाब म्हणजे ऑफर फॉर सेलमध्ये शेअर्स विकले जाणार नाहीत.

आनंद राठी कंपनी बद्दल थोडक्यात

आनंदराठी ब्रँड नावाखाली ही कंपनी ग्राहकांना ब्रोकरेज, मार्जिन ट्रेडिंग आणि विविध आर्थिक उत्पादने ऑफर करते व तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून या व्यवसायामध्ये ही कंपनी काम करत आहे. या कंपनीकडे किरकोळ गुंतवणूकदार तसेच उच्च निव्वळ संपत्ती असलेले व्यक्ती व संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत एक मजबूत आणि वैविध्यपूर्ण ग्राहकांचा मोठा आधार आहे. साधारणपणे मार्च 2025 पर्यंत या कंपनीचे जाळे संपूर्ण भारतामध्ये पसरले असून 54 शहरांमध्ये 90 शाखा व 290 शहरांमध्ये 1125 अधिकृत प्रतिनिधी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe