Investment Tips:- गुंतवणूक ही आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. तुम्ही जे काही पैसे कमवतात त्या पैशांची बचत करून जर तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या समृद्ध होते व भविष्य आर्थिक दृष्ट्या समृद्ध असणे ही काळाची गरज आहे. परंतु बऱ्याचदा पगार खूप कमी असतो व अशा पगारांमध्ये सगळा खर्च भागवून बचत करणे खूप कठीण काम असते. अशा वेळेस समजा तुम्हाला कमी पगार आहे व तुम्हाला गुंतवणूक देखील करायची आहे तर मात्र यामध्ये तुम्ही काही सूक्ष्म नियोजन करणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण या लेखामध्ये असा एक फार्मूला आणि काही पर्याय बघणार आहोत जे तुम्हाला कमी पगारात देखील गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ शकतील व तुम्हाला सहजपणे गुंतवणूक करता येऊ शकेल.
कमी पगार असलेल्या लोकांसाठी 50:30:20 चा गुंतवणूक फार्मूला
पगार जर कमी असेल व तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. हा फॉर्म्युला समजून घ्यायचा असेल तर यामध्ये पहिला जो अंक आहे 50 त्यामध्ये तुमच्या पगाराचा 50% रक्कम तुम्ही आवश्यक खर्चासाठी खर्च करणे गरजेचे आहे. तसेच या सूत्रातील तीस हा आकडा दर्शवतो की कपडे, अन्न किंवा तुमच्या आवडीनिवडी इत्यादी खर्चांवर तुम्ही 30% पैसे खर्च करू शकतात. मात्र या फॉर्मुल्यातील 20 हा आकडा अतिशय महत्त्वाचा असून यानुसार तुम्ही 20% पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचा महिन्याला पगार जर वीस हजार रुपये असेल तर यातील 20% म्हणजेच महिन्याला 4000 रुपये तुम्ही कुठल्याही परिस्थितीत वाचवणे गरजेचे आहे व त्या चार हजारांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करणे फायद्याचे ठरते.

कमी पगार असलेल्यांसाठी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय
1- पोस्ट ऑफिसची आरडी योजना- तुमची पगार कमी असेल व तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसची आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट योजना अतिशय फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला अगदी कमीत कमी गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेत तुम्ही तुमच्या पगारातील फक्त एक हजार रुपयांपासून प्रत्येक महिन्याला गुंतवणूक सुरू करू शकतात व काही कालावधीत लाखो रुपयांचा फंड जमा करू शकतात.
2- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजना- कमी पगार असलेल्या व्यक्तींकरिता गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही अगदी छोट्याशा रकमेने गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. यामध्ये देखील महिन्याला एक हजार रुपये तुम्ही जमा करू शकतात व वर्षाला 12 हजार रुपयांची गुंतवणूक सहजपणे करू शकतात.