EPFO News : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. हे पीएफ अकाउंट ईपीएफओद्वारे संचालित केले जाते.
दरम्यान पीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओकडून लवकरच मोठी भेट मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ईपीएफओ कर्मचाऱ्यांना 4 नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

हे 4 गिफ्ट दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात घेतले जाणारे हे निर्णय देशभरातील पाच कोटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना बळ देणारे ठरतील अशी आशा आहे.
दरम्यान आता आपण ईपीएफओ कडून ऑक्टोबर महिन्यात कोणते निर्णय घेतले जाणार आणि याचा कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
ईपीएफओ हे 4 निर्णय घेणार
ऑक्टोबर महिन्यात ईपीएफओ 3.0 लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पीएफ खातेधारकांना पीएफची रक्कम सहज काढता येणार आहे. ईपीएफओ कडून एक विशेष एटीएम कार्ड जारी केले जाणार आहे. याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना एटीएम मधून पीएफ चा पैसा काढता येणार आहे. तसेच यूपीआयच्या मदतीने देखील पीएफ चा पैसा काढता येईल.
ईपीएफओच्या या नव्या प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना एक नवीन डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना अगदी एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांना मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम, मासिक जमा रक्कम आणि क्लेम बाबत माहिती मिळणार आहे.
ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. आता कर्मचाऱ्यांना सात लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण मिळते आणि याचे प्रीमियम कंपनीकडून भरले जाते. पण ऑक्टोबरमध्ये ही रक्कम वाढवली जाणार आहे.
ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना किमान एक हजार रुपयांची पेन्शन दिली जात आहे. पण EPS ची किमान पेन्शनची मर्यादा 500 किंवा 1500 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. अर्थात यापुढे कर्मचार्यांना किमान मासिक पेन्शन 1500 किंवा 2500 रुपये देण्यात येईल. यासंदर्भातील निर्णय ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.