Aadhar Card News : केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा देशभरातील लाखो आधार कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे.
आधार कार्ड विना देशात कोणतेच काम होऊ शकत नाही. या कागदपत्राशिवाय देशात साधा एक सिमकार्ड सुद्धा मिळत नाही. शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप साठी बँकेत अकाऊंट ओपन करण्यासाठी केवायसी साठी सगळ्याच ठिकाणी आधार कार्ड लागते.

कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक असते. या कार्ड विना देशात कोणतच शासकीय आणि निमशासकीय काम केले जाऊ शकत नाही. अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक आहे.
महत्वाची बाब म्हणजे हे दस्तऐवज पूर्णपणे अपडेट असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. दरम्यान आता आधार कार्ड च्या अपडेट संदर्भात केंद्रातील सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता लहान मुलांची आणि अल्पवयीन मुलांची नवीन नोंदणी व बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच लहान मुलांचे आधार कार्ड आता विनाशुल्क अपडेट करता येणार आहे.
याआधी लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क भरावे लागत होते. पण आता ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला आहे.
यामुळे साहजिकच पालकांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता 5-7 वर्ष वयोगटातील लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेच शुल्क लागणार नाही.
सोबतच 15-17 वयोगटातील मुलांचे आधार सुद्धा विनाशुल्क अपडेट करता येणार आहे. नक्कीच या निर्णयाचा लाखों लोकांना फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने लहान मुलांनाही आधार कार्डाचं बायोमेट्रिक अपडेट करणे सक्तीचे केलं आहे. यामुळे या निर्णयाचा देशभरातील पालकांना फायदा होणार आहे.