Dryfruits Rate : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एक मोठी घोषणा केली होती. मोदी यांनी जीएसटीचे रेट कमी होतील असे जाहीर केले होते. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विविध वस्तूंवरील जीएसटीचे रेट कमी करण्याची घोषणा केली.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय झाला. केंद्रातील सरकारने जीएसटीचे 12% आणि 28% हे दोन स्लॅब रद्द केलेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोनच स्लॅब शिल्लक राहिले आहेत.

यासोबतच केंद्रातील सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी शून्य करण्याचा निर्णय घेतलाय. तर काही वस्तूंवरील जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ड्रायफ्रुट्सवरील जीएसटी देखील 12 टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे.
अर्थात आता काजू बदाम सारखे सर्वच ड्रायफ्रूट स्वस्त होणार आहेत. पण कोणत्या ड्रायफ्रूट्स किती रुपयांनी स्वस्त होणार, काजू बदाम खजूर यांच्या किमती किलोमागे किती रुपयांनी कमी होणार? याच बाबत आज आपण या लेखातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुकामेवा आधीचे रेट GST कमी झाल्यानंतरचे रेट
खजूर 336 315
बदाम 896 840
पिस्ता 1250 1150
अंजीर 1500 1300
खारीक 280 250
जर्दाळू 500 400
अक्रोड 1260 1140
सुकामेव्याचे रेट 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. ड्रायफ्रूट स्वस्त होणार असल्याने काजू बदामाता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर येतील आणि यामुळे खऱ्या अर्थाने गरिबांच्या पंचपकवानांमध्ये देखील आता सुकामेव्याचा सुगंध दरवळताना पाहायला मिळणार आहे.
सर्वसामान्य जनतेचा नवरात्रोत्सव आणि दिवाळीचा काळ यंदा नक्कीच खास ठरणार आहे. जीएसटी चे रेट कमी झाले असल्याने ड्रायफ्रूट्सला चांगला उठाव मिळणार आहे आणि यामुळे उद्योगांना देखील चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.