ई-केवायसी करताना ‘ही’ एक चूक केली तर केवायसी करूनही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत, वाचा…

Published on -

Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रातील महिला वर्गात एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे केवायसीची. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच याचा पंधरावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. पण या योजनेमध्ये मोठी अनियमितता सुद्धा आढळून आली आहे.

अनेक अपात्र महिलांनी याचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. आता सरकारकडून योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.

यासाठी तीन दिवसांपूर्वी एक जीआर काढण्यात आला आहे आणि या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार महिलांना केवायसी करण्यासाठी फक्त दोन महिन्यांची मुदत राहणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्यात महिलांना केवायसी करायची आहे. केवायसी ची प्रोसेस कशी असेल याबाबत ही सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी करायची आहे. ई केवायसी करताना महिलांना आपल्या आधार कार्डची माहिती द्यायची आहे.

यासोबतच लाभार्थ्यांना आपल्या पतीची किंवा वडिलांच्या आधार कार्ड बाबतही माहिती द्यायची आहे. जर वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

त्यामुळे जर तुमचीही केवायसी होत नसेल तर तुम्ही आधी ही गोष्ट तपासायला हवी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवायसी करताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी.

ई- केवायसी करताना महिलांना दोन बाबी स्वतः प्रमाणित करायच्या आहेत. पण तुम्ही ही माहिती प्रमाणित करताना काळजीपूर्वक आणि योग्य तोच पर्याय निवडायला हवा.

यातील पहिला मुद्दा असा आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत की नाहीत? याचे उत्तर तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायचे आहे.

आता तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नाहीये पण चुकून जर तुमच्याकडून हो या पर्यायावर क्लिक झाले तर केवायसी नंतर सुद्धा तुम्हाला योजनेतून बाद केले जाणार आहे.

तसेच यातील दुसरा मुद्दा असा आहे की, माझ्या कुटुंबात केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिलाच लाभ घेत आहे. याचे उत्तरही तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायचे आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News