7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ऑक्टोबर महिना मोठा खास ठरणार आहे. पुढील महिन्यात दिवाळी येत आहे. यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सरकार मोठी भेट देण्याचे तयारी करत आहे.
सरकारकडून दिवाळीपूर्वीच महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होईल असा अंदाज देण्यात आला आहे. मार्च महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता.

यानुसार आता महागाई भत्ता 55% झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू आहे. आता जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची आकडेवारी तयार केली जात आहे.
ही आकडेवारी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) च्या आकडेवारीच्या आधारावर महागाई भत्ता वाढ ठरविली जाणार आहे.
या आकडेवारीचा विचार केला असता यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो. अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% टक्क्यांवर पोहोचणार आहे.
यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारकडून महागाई भत्त्याविषयीचा अधिकृत निर्णय दिवाळीपूर्वीच घेतला जाणार आहे. म्हणजे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय दिवाळीच्या आधीच जारी होणार आहे.
13 ऑक्टोबरला दिवाळी आहे यामुळे या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येईल.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम देण्यात येणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला तरी, यामुळे लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.
एकीकडे केंद्रातील सरकारने जीएसटीचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर आता दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाईल आणि यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.
यंदा दिवाळीत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळणारी DA वाढीची भेट त्यांच्या खिशाला दिलासा देणार आहे. जीएसटी कपात आणि महागाई भत्त्यातील संभाव्य वाढ यामुळे दिवाळीत ग्राहक खर्चात वाढ होईल. परिणामी बाजारपेठेतील उलाढालही वेग घेण्याची अपेक्षा आहे.