अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी तब्बल 60 कोटी रुपये दिल्याचा दावा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.
मात्र, यातील महापालिकेला कोविड नियंत्रणासाठी एक रुपया ही मिळाला नसल्याचे भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.
त्यामुळे 60 कोटी गेले कुठे असा ही प्रश्न उपस्थित होत. खासदर डॉ. विखे यांनी मध्यंतरी जाहीर सभेत बोलताना केंद्र सरकारने 60 कोटी रुपये नगर जिल्ह्याला दिले असून,
यातून कोविड नियंत्रण व उपाययोजना करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आता जिल्ह्याला केंद्राकडून 60 कोटीचा निधी दिल्याचा दावा केला असल्याने या पैशांतून जिल्ह्यात नेमका कशासाठी व किती खर्च झाला,
याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौर व आयुक्तांनी महापालिकेला यातून एक पैसाही मिळाला नसल्याचे सांगितले. मग हे पैसे कोठे खर्च झाले, याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने आपत्कालीन निधीतून सुमारे 12 लाख, एनएचयुएम निधीतून 2 कोटी व 14 व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून 2 कोटी 64 लाख खर्चाची मुभा महापालिकेला दिली आहे.
यातून कोविड टेस्टींग कीट व अन्य अनुषंगिक मिळून आतापर्यंत सुमारे अडीच कोटीचा खर्च झाल्याची माहिती आयुक्त मायकलवार यांनी दिली.
त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या 60 कोटीपैकी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला नेमके किती व महापालिका क्षेत्राला नेमके किती पैसे मिळाले, हे अजून अनुत्तरीतच आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved