iPhone 15 Discount Offer : जगप्रसिद्ध टेक दिग्गज ॲपल कंपनीने अलीकडेच आयफोन चे एक नवीन मॉडेल बाजारात सादर केले आहे. 9 सप्टेंबरला आयफोन 17 ही सिरीज लॉन्च करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन प्रेमी या सिरीजची वाट पाहत होते आणि अखेर कार ही सिरीज आता ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय ग्राहकांना iPhone 17 खरेदी करता येत आहे.

दरम्यान नवीन सिरीज लॉन्च झाल्यानंतर आधीच्या आयफोनच्या किमती कमी झाल्या आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला ही नवा iphone खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी राहणार आहे.
दरम्यान अॅपलच्या लोकप्रिय आयफोन 15 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट ऑफर सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 80 हजाराचा हा फोन ग्राहकांना 45 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे.
अर्थात जवळपास 50% डिस्काउंट ऑफरचा लाभ ग्राहकांना मिळेल. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन 45 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल अशी माहिती समोर येत आहे.
खरे तर हा फोन जेव्हा लॉन्च झाला तेव्हा याची किंमत 79 हजार 900 रुपये होती. आता अमेझॉनवर हा फोन 59 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजे लॉन्चिंग प्राईस पेक्षा याची किंमत 37 हजार रुपयांपर्यंत घसरली आहे.
दरम्यान आता अमेझॉनवर सेल सुरू होणार आहे. या सेलदरम्यान हा फोन आणखी कमी किमतीत मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार अमेझॉनच्या सेलमध्ये आयफोन 15 ग्राहकांना फक्त 43 हजार 749 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
पण ही ऑफर लिमिटेड काळासाठी राहील. अमेझॉन चा सेल 23 सप्टेंबर पासून सुरू होतोय. या सेलमध्ये आयफोन 15 कमी किमतीत खरेदी करता येईल. ब्लॅक, ब्लू, एक्स-ग्रीन, पिंक आणि येलो अशा पाच रंगांमध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
अॅपलने आयफोन 17 सीरिजच्या लॉन्चनंतर अधिकृत स्टोअरवरून आयफोन 15 काढून टाकला असला, तरी अमेझॉनवर तो अजूनही उपलब्ध आहे.