पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! 5 वर्षात मिळणार 22 लाख रुपये, पंतप्रधान मोदींनी पण केली गुंतवणूक

Published on -

Post Office Scheme : या वर्षात देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉझिटवरील व्याज कमी केले आहे. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर फिक्स डिपॉझिट चे व्याज कमी झाले आहे. यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय.

अशा स्थितीत जर तुम्हाला एफडी पेक्षा अधिक रिटर्न मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम फायद्याची ठरणार आहे. या योजनेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून गुंतवणूकदारांना चांगले व्याज दिले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. पोस्ट ऑफिस ची ही एक फिक्स इन्कम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे.

या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदार फिक्स डिपॉझिट पेक्षा अधिकचे व्याज मिळवू शकतात. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. दहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या नावाने पालकांना गुंतवणूक करता येते.

दहा वर्ष वय झाल्यानंतर NSC अकाउंट ची सर्व जबाबदारी त्या मुलाला मिळते. नरेंद्र मोदी यांनी एनएससी मध्ये 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. इथे जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही.

गुंतवणूकदाराला हवी तेवढी रक्कम तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत 7.7 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेचा लॉक इन पिरेड पाच वर्षांचा आहे. अर्थात पाच वर्षांपूर्वी या योजनेतील रक्कम काढता येत नाही.

कसे मिळणार 22 लाख रुपये 

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही पाच वर्षांची योजना आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने जर NSC मध्ये 15 लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 7.7 टक्के दराने पाच वर्षांनी 21 लाख 73 हजार 551 रुपये मिळणार आहेत.

अर्थात गुंतवणूकदाराला सहा लाख 73 हजार 551 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील. थोडक्यात या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून जवळपास 22 लाख रुपये मिळवता येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe