India’s Richest District : गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या श्रीमंत शहरांनी अर्थव्यवस्थेत चांगले योगदान दिले आहे.
पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा कोणता याची माहिती आहे का? नाही. मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे.

देशाचे अर्थव्यवस्था सध्या चौथ्या क्रमांकावर आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकाची होईल असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आपला देश पर कॅपिटा इन्कम मध्ये आजही अनेक छोट्या देशांपेक्षा मागे आहे.
देशाची लोकसंख्या आणि संपत्तीचे असमान वितरण यामुळे देशात दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण फार अधिक आहे. मात्र देशात असेही काही जिल्हे आहेत जे की फारच श्रीमंत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रात नाही.
मुंबई देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण की देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा हा तेलंगाना राज्यात आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची वार्षिक कमाई 11.46 लाख रुपये आहे.
अर्थात येथील नागरिक वर्षाला जवळपास 12 लाख रुपये आणि महिन्याला एक लाख रुपयांची कमाई करत आहेत. हा जिल्हा हैदराबाद जवळ आहे. आयटी, फार्मा आणि टेक्नॉलॉजी सेक्टर मुळे या जिल्ह्यातील नागरिकांच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे देशातील टॉप 10 श्रीमंत जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश होत नाही. पण टॉप 10 जिल्ह्यांमध्ये मुंबईचा समावेश होतो. मुंबई या यादीत नवव्या स्थानावर आहे.
येथील नागरिकांची वार्षिक कमाई 6.57 लाख इतकी आहे. बँकिंग शेअर बाजार आणि फिल्म इंडस्ट्री मुळे या यादीत मुंबई जिल्ह्याचा समावेश होतो. इथे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्याचा 10 वा नंबर लागतो. येथील नागरिकांची सरासरी वार्षिक कमाई 6.30 लाख आहे.
टॉप श्रीमंत जिल्हे
1)रंगारेड्डी, तेलंगाना
2)गुरुग्राम, हरियाणा
3)बेंगलुरु शहर, कर्नाटक
4)नोएडा, युपी
5)सोलन, हिमाचल प्रदेश
6)उत्तर व दक्षिण गोवा
7)गंगटोक व नामची, सिक्कीम
8)चेन्नई, तामिळनाडू
9)मुंबई, महाराष्ट्र
10)अहमदाबाद, गुजरात