रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ‘हे’ 3 मोठे आर्थिक लाभ !

Published on -

7th Pay Commission : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी नोकरी तरुणांमध्ये नेहमीच आकर्षणाची राहिली आहे. देशातील लाखो करोडो लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत.

आर्थिक सुरक्षितता, पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ, नोकरीनंतर मिळणारे लाभ यामुळे अनेकजण सरकारी नोकरीकडे वळत आहेत.

पण तुम्हाला रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतात हे माहिती आहे का? नाही. मग आज आपण याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हे 3 आर्थिक लाभ

Gratuity मिळणार : सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युइटी अर्थात सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ दिला जात असतो. हा लाभ मुळ वेतनावर आधारित असतो. त्याची गणना करण्यासाठीचे सूत्र आहे – शेवटचे मुळ वेतन X (सेवाकाळ X 2) / 4 असे आहे.

आधी कर्मचाऱ्यांना फक्त 14 लाख रुपयांची ग्रॅच्युइटी मिळत असे. पण आता सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 20 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी मोठा दिलासा मिळाला आहे. 

अंशराशीकरण (Commutation of Pension) : रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा काही भाग एकरकमी स्वरूपात दिला जातो.

यासाठी सूत्र आहे – मुळ वेतन X 40% X 12 X अंशराशीकरणाचा सुधारित तक्तानुसार मूल्य. त्यामुळे पेन्शनधारकांना मासिक हप्त्यांऐवजी काही प्रमाणात तात्काळ रक्कम मिळते.

पेन्शनचा लाभ मिळतो : सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायर झाले की पेन्शनचाही लाभ मिळतो. निवृत्तीवेतनाबाबत शासनाने स्पष्ट नियम तयार केले आहेत. जुनी पेन्शन योजना असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळत असतो.

पण, सुधारित पेन्शन योजना (युपीएस/राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी किमान 25 वर्षांची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना या सुधारित योजनेत पूर्ण लाभ मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe