ATM Card News : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर आजकाल पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. यूपीआयमुळे एका क्लिकवर कोणालाही आणि कुठेही पैसे पाठवता येतात.
देशातील कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला केवळ एका क्लिकवर पैसे पाठवता येतात. ऑनलाइन पेमेंटसाठी बँक अकाउंट आणि एटीएम कार्ड फारच आवश्यक असते. एटीएम कार्ड फक्त यूपीआयसाठीच नाही तर याच्या माध्यमातून आपल्याला कॅशही काढता येते.

अचानक आपल्याला कॅशची गरज पडली तर आपण एटीएम मशीन मधून पैसे काढतो. यासाठी पिन टाकावा लागतो. दरम्यान आज आपण याच एटीएम पिन बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर बँकेकडून एटीएम मिळाल्यानंतर आपल्याला एक पिन जनरेट करावा लागतो. पण हा पिन तयार करताना आपली एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडू शकते. एटीएम पिन तयार करताना ग्राहकाने काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
खरेतर या डिजिटल युगात सायबर ठगांची संख्या वाढली आहे. आधी ज्या पद्धतीने पाकीटमारी मोठ्या पद्धतीने होत होती त्याचं पद्धतीने आता सायबर चोरी सुद्धा वाढली आहे. सायबर ठग कुठूनही आपल्या बँक अकाउंट मधून पैसे गायब करू शकतात.
हे सायबर ठग एटीएम पिनच्या माध्यमातूनही आपले पैसे ढापू शकतात. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटमधील पैशांची सुरक्षितता ठेवायची असेल तर एटीएमचा पिन फारच मजबूत असायला हवा.
सहजासहजी हॅक होणार नाही असा पिन कोड सेट करायला हवा. यामुळे एटीएम पिन जनरेट करताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.
असे नंबर्स एटीएम पिन म्हणून सेट करू नका
संपूर्ण जगभरात 1234 आणि 0000 असे एटीएम पिन सर्वाधिक सेट केले जातात. मात्र हे पिन सायबर ठग सहज हॅक करू शकतात. यामुळे तुम्ही एटीएमसाठी असा सोपा पिन टाकायला नको.
जर तुमचाही असाच सोपा पिन असेल तर तुम्ही तो ताबडतोब बदलायला हवा. एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड सुद्धा असुरक्षित आहेत. यामुळे 1111, 2222 अशा अंकांचा पिन टाकू नका. अनुक्रमे येणारे क्रमांक जसे की 2345, 4567 असे पिन देखील सहज सापडतात.
यामुळे हे नंबरही पिन म्हणून सेट करू नका. तुमच्या वैयक्तिक माहितीचा देखील पिन कोड तुम्ही वापरायला नको. अनेकजण आपले जन्मवर्ष जसे की 1997 पिन म्हणून टाकतात. पण अशा प्रकारचा पिन कोड देखील पूर्णपणे असुरक्षित आहे.